सुनीता देवी (जन्म: १९८०) ह्या एक भारतीय महिला गवंडी आहेत ज्यांना शौचालये बांधल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या गावात पूर्वी ९०% महिलांना शौचालयाची सुविधा नव्हती. सुनीता देवीच्या परिश्रमामुळे आता सर्व महिला शौचालयाचा वापर करतात. या कामासाठी त्यांना २०१९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला.
सुनीता देवीचा जन्म १९८० मध्ये नवी दिल्ली येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात आपली पदवी पूर्ण केली. २०१० मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्या नवीन घरात शौचालय नव्हते हे पाहून त्यांना धक्का बसला. सदरील उदयपुरा हे गाव झारखंड राज्याची राजधानी रांची पासून केवळ ११५ किमी होते. आसपासच्या इतर गावातील परिस्थिती देखील अशीच होती. केवळ १०% महिलांच्या घरी शौचालयाची सुविधा होती, तर उर्वरित महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते.
२०१५ मध्ये जेव्हा स्वच्छ भारत मिशन -ग्रामीण (SBM-G) सारख्या इतर संस्था त्यांच्या गावात आल्या तेव्हा सुनीता देवी यांनी
शौचालयांबद्दल बोलायला पुढाकार घेतला. या मोहिमेचा उद्देश उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त समाज निर्माण करणे होता. यासाठी ही संस्था ग्रामीण कुटुंबाने बांधलेल्या प्रत्येक शौचालयासाठी १२,००० रुपयांचे अनुदान देत होती.
देवीने याकामी रस घेतला. त्यांना गवंडी बनण्याचे प्रशिक्षण घ्यायचे होते पण त्या महिला असल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्याला विरोध केला. कारण गवंडीकाम पुरुष करत असत, याच बरोबर अनेक गवंडी शौचालये बांधण्याचे काम हलके मानत असत. देवीने तीच्या पतीच्या पाठिंब्याने प्रशिक्षण घेतले आणि "राणी मिस्त्री" (महिला गवंडी) बनली. उदयपुरा येथे इतर महिलांना या कामात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या गोष्टीला तेव्हा काहीं लोकांनी त्यांना विरोध केला. तर काहींनी त्यांना तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. देवींना या गोष्टीचे आश्चर्य वाटले की लोकांनी त्यांच्या शौचालय बांधण्यास आक्षेप घेतला, परंतु महिलांनी रस्त्यावर शौचास करण्यास कोणताही विरोध केला नाही.
तिला २०१९ मध्ये नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. "२०१८" सालचा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारताच्या राष्ट्रपतींनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रदान केला. एका वर्षानंतर राष्ट्रपतींनी कानपूरमध्ये शौचालय बांधण्याचे गवंडी म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या आणखी एका महिला कलावती देवी यांचा सन्मान केला. पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या कार्याचा उल्लेख केला ज्यामुळे देवीला त्यांच्या कार्याची विशेष प्रशंसा केल्याची खुशी मिळाली.
सुनीता देवी
या विषयावर तज्ञ बना.