आरिफा जान (जन्म: १९८७) या काश्मीरमधील श्रीनगर येथे रग बनवणारी भारतीय महिला आहेत. जान यांना ८ मार्च २०२० रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आरिफा जानचा जन्म इ.स. १९८७ साली झाला. नामदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मिरी रग बनविण्याच्या कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी क्राफ्ट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, श्रीनगरमधून पदवी प्राप्त केली आणि नामदा टेक्सटाइल्सवर आधारित प्रकल्पात त्या गुंतलेल्या आहेत. ११ व्या शतकापासून नामदा रग्ज बनवले जात आहेत. हे रग विणलेले नसून फेल्ट केलेले आहेत; ज्यात वुलन फायबरचे थर एकत्र ठोकून कुटून त्यावर चमकदार भरतकाम केले जाते. श्रीनगर मधील जुने भाग यासाठी ओळखले जातात. मात्र आता रंगाईसारखी काही कौशल्ये तितकीशी लोकप्रिय नाहीत.
त्यांनी तीन उत्पादन केंद्रे निर्माण केली आहेत ज्यात २५ लोक काम करतात. तसेच १०० महिलांना हे फेटेड रग्ज तयार करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. पहिले निर्मिती केंद्र श्रीनगरच्या जुन्या भागात होते. नंतर परत त्यांनी श्रीनगर, नूरबाग आणि नवा कादल या दोन इतर भागातही अशाच संघटना निर्माण केल्या.
"मॅग्निफिसेंट सेव्हन" म्हणून गणल्या जाणाऱ्यापैकी एक जान आहेत. महिला दिनी पंतप्रधानांचे खाते हाताळण्यासाठी या सात महिलांची निवड करण्यात आली होती. चेन्नईस्थित सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा मोहनडोस, बॉम्बस्फोटात वाचलेली मालविका अय्यर, काश्मिरी नुमधा मशरूम शेतकरी बीना देवी, शहरी जलसंरक्षक कल्पना रमेश, महाराष्ट्र बंजारा हस्तकला प्रवर्तक विजया पवार आणि महिला मेसन कलावती देवी यांचा त्यात समावेश होता.
त्याच दिवशी त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आरिफा जान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.