ज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका (इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी) म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे या दीर्घिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना नसतात, त्यांचा आकार त्रिमितीय असतो आणि त्यांच्यातील तारे केंद्राभोवती काहीसे यादृच्छिक कक्षेत असतात. या दीर्घिकांचा गट हा एडविन हबलने १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारलेल्या तीन मुख्य गटांपैकी एक गट आहे. हबलला लंबवर्तुळाकार दीर्घिका कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये विकसित होतात असे वाटले होते. कालांतराने ते चुकीचे आहे असा शोध लागला. लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील तारे सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांपेक्षा बरेच जुने असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लंबवर्तुळाकार दीर्घिका
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.