सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे निश्चित आकार नसणाऱ्या दीर्घिकांना आकारहीन दीर्घिका (इंग्रजी: Irregular galaxy - इर्रेग्यूलर गॅलॅक्सी) म्हणतात. आकारहीन दीर्घिकांचा आकार असामान्य असतो. ते हबल अनुक्रमाच्या कोणत्याही नियमित गटात बसत नाहीत आणि त्यांच्यामध्ये तेजोगोल ही नसतो व सर्पिलाकार फाटेही नसतात.
एकूण दीर्घिकांपैकी यांची संख्या एकत्रितपणे एक चतुर्थांश आहे असे मानले जाते. काही आकारहीन दीर्घिका एकेकाळी सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार होत्या, पण गुरुत्वीय बलातील विषमतेमुळे त्यांचा आकार अनियमित झाला. आकारहीन दीर्घिकांमध्ये विपुल प्रमाणात वायु व धूळ असू शकते. हे बटू (ठेंगण्या) आकारहीन दीर्घिकांसाठी अपरिहार्यपणे खरे नाही.
आकारहीन दीर्घिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.