मसूराकार दीर्घिका

या विषयातील रहस्ये उलगडा.

मसूराकार दीर्घिका

दीर्घिकांच्या संरचनात्मक वर्गीकरणामध्ये मसूराकार दीर्घिका किंवा बहिर्गोल भिंगाकार दीर्घिका (Lenticular galaxy) लंबवर्तुळाकार आणि सर्पिलाकार दीर्घिकांच्या मध्ये असतात. मसूराकार दीर्घिका सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे चपट्या तबकडीसारख्या असतात आणि त्यांनी जवळपास सर्व आंतरतारकीय माध्यम वापरलेले असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये नवीन ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग अतिशय कमी असतो. तरीही त्यांच्या तबकडीमध्ये लक्षणीय प्रमाणात धूळ कायम राहू शकते. त्यामुळे लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे त्यांच्यामध्ये मुख्यत: जुने तारे असतात. त्यांच्यामध्ये सर्पिलाकार फाटे नसल्याने जर त्या फेस-ऑन कललेल्या असल्या तर त्यांच्यामध्ये आणि लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये फरक करणे अतिशय अवघड असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →