रियाध मेट्रो (अरबी : قطار الرياض) ही सौदी अरेबियाची राजधानी रियाध, येथे सेवा देणारी एक जलद परिवहन प्रणाली आहे. रियाध सार्वजनिक वाहतुकीसाठी किंग अब्दुलअझीझ प्रकल्पाचा एक भाग म्हणून, ही जगातील सर्वात लांब चालकविरहित मेट्रो प्रणाली आहे.
या प्रणालीमध्ये ८५ स्थानकांना जोडणाऱ्या आणि १७६ किलोमीटर एकूण लांबी असलेल्या सहा मार्गिका आहेत. मक्का येथील अल मशाएर–अल मुगद्दासाह मेट्रो नंतर ही सौदी अरेबियातील दुसरी, अरबी द्वीपकल्पातील चौथी, अरब जगात सहावी आणि मध्य पूर्वेतील पंधरावी मेट्रो प्रणाली आहे. या प्रकल्पासाठी २२.५ अब्ज डॉलरचा खर्च आला. ही सेवा प्रवाशांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी उघडण्यात आली.
रियाध मेट्रो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?