मेवाती गाय किंवा कोसी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश गोवंश आहे. या गोवंशाचे नाव हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यावरून पडले आहे. हा गीर आणि हरियाणवी जातींच्या जवळचा असल्याचे मानले जाते. हा गोवंश जवळजवळ सर्वत्र पांढऱ्या रंगाचा असतो आणि क्वचितच त्यावर तपकिरी छटा देखील आढळतात. उत्तम दुग्धोत्पादन आणि मशागतीसाठी उपयुक्त असल्यामुळे ही दुहेरी उद्देशाची जात मानली जाते. बैल त्यांच्या सामर्थ्य आणि सहनशक्तीसाठी ओळखले जातात आणि ते शेतीकामासाठी आणि बैलगाडीसाठी वापरले जातात
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेवाती गाय
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.