ब्राह्मण गाय

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ब्राह्मण गाय

ब्राह्मण गाय हा एक अमेरिकन पशु-गोवंश असून याची निर्मिती विविध भारतीय गोवंशापासून झालेली आहे.

या गाईच्या निर्मितीसाठी अंदाजे २६६ विविध वळू आणि २२ गाईंचा वापर करण्यात आला. यात गीर, ओंगल, कृष्णातिरी, कांकरेज, हरियाना आदी भारतीय वंश वापरण्यात आले. तसेच भारतीय गाईपासून निर्मित ब्राझील मधील गुझेरात आणि नेल्लूर नावाचे संकरित वंश सुद्धा वापरल्या गेले. परिणाम स्वरूप एक अत्यंत काटक, विविध प्रतिकूल परिस्थितीत टिकणारी, जाड त्वचा असलेली उंचपुरी प्रजाती निर्माण झाली. या प्रजातीचा मुख्य उपयोग मांसाहारासाठी करण्यात येतो.

तसेच ही गाय अमेरिकेतून अर्जेटीना, ब्राझील, ओमान सहित अनेक देशात निर्यात केली जाते. ब्राह्मण गायिपासून नंतर बीफ मास्टर, सांता गरडरीयस, ब्रँगस, ब्रैँफोर्ड सहित अनेक नवीन परदेशी गोवंश निर्माण केल्या गेले..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →