ओंगल गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल या गावातील आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत कधीकाळी ही प्रजाती खूप प्रसिद्ध होती. विशेषकरून जलीकट्टू या खेळासाठी या प्रजातीचे सांड वापरले जात असत. यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आणि मजबूत अंगकाठीमुळे या प्रजातीचे बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओंगल गाय
थोडक्यात पण महत्त्वाचे.