पुलिकुलम हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः तामिळनाडू राज्यातील बैलांशी संबंधित असलेल्या जल्लीकट्टु खेळासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात होता. जलीकट्टू खेळास सर्वोच्च न्यायालयाने इ.स. २०१४ मध्ये भारतात बंदीचा आदेश दिलेला आहे.
पुलिकुलम हे तामिळनाडू राज्यातील शिवगंगा जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावात हा गोवंश मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि यामुळेच या गावाच्या नावावरून या गोवंशाला सुद्धा पुलिकुलम असे म्हणतात. हा गोवंश अत्यंत शांत परंतु धाडसी असल्यामुळे, तसेच याची शिंगे धारदार असल्यामुळे 'कोणार' आणि 'थेवर' समुदायाने याचे जतन केले आहे. तमिळ भाषेत पुली म्हणजे वाघ आणि कुलम म्हणजे तळे. त्यावरून या गावाचे नाव पुलिकुलम असे पडले. या भागात वाघ पाणी पिण्यासाठी येत असत तेव्हा हा गोवंश वाघाशी अगदी निकराने लढत असे.
हा गोवंश तामिळनाडूच्या रामनाथपुरम, तिरुनेलवेली, शिवगंगा, मदुराई तसेच विरुधु नगर जिल्हात मोठ्या प्रमाणावर शेतीकामासाठी वापरला जातो.
पुलिकुलम गाय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!