नेल्लूर गाय

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नेल्लूर गाय

नेल्लूर किंवा नेलोर (इंग्रजी:nelore cattle, तेलुगू:నెల్లూరు ఆవు) हा भारतीय गोवंशापासून निर्मित एक ब्राझील देशातील गोवंश आहे. इ.स. १८६८ मध्ये भारतातून ओंगल गोवंश जेव्हा ब्राझीलला पोहोचला, तेथून या गोवंशाचा स्थानिक प्रजातींशी संकर करून, संकर आणि निवड या दोन्ही पद्धतीने सध्याच्या नेल्लूर गोवंशाची निर्मिती केल्या गेली. आज हा ब्राझीलचा सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा मुख्य गोवंश आहे. याचा प्रमुख वापर मांसाहारासाठी केला जातो.

त्याकाळी ओंगल गोवंश हा नेल्लोर प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळत होता, त्यामुळे या गोवंशाचे नाव नेलोर (इंग्रजीत nelore) असे ठेवण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रयोगानंतर यात पुढील महत्त्वाचे गुणधर्म उतरले-



काटक, निरोगी आणि भरल्या अंगाचा गोवंश.

थंडी वगळता, उष्ण, दमट, कोरडे किंवा इतर प्रतिकूल वातावरणात सहज टिकणारा गोवंश.

८ मिलिमीटर पेक्षा अधिक जाड कातडे, त्यामुळे रक्तशोषक किडींना न बाधणारा गोवंश.

उत्तर पचनक्षमता, त्यामुळे खास विशिष्ट खुराक नाही दिला तरी चालतो.

उत्तम चविष्ट मांस.

उत्तम प्रजोत्पादन क्षमता.

शांत, लाजाळू आणि वात्सल्यपूर्ण स्वभाव.

या गोवंशाचा वापर अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीत सुद्धा केला गेला. आज ब्राझील मधून हा गोवंश अर्जेन्टिना, पेराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका सहित अनेक मांसाहारी देशात निर्यात केला जातो. यामुळे गुझेरात पाठोपाठ हा गोवंश ब्राझीलच्या पशुधनात एक मनाचा गोवंश ठरला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →