मुस्लिम सहकारी संघटना

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इस्लामिक सहकारी संघटना (इंग्लिश: Organisation of Islamic Cooperation; अरबी: منظمة التعاون الاسلامي; फ्रेंच: Organisation de la Coopération Islamique; संक्षेपः ओआयसी) ही ५७ सदस्य राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना मुस्लिम जगतातील देशांचे व त्यांच्या नागरिकांचे एकत्रित प्रतिनिधित्व करते व त्यांचे हित जोपासते.

जगातील सर्व इस्लामिक देश ह्या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच सदस्य राष्ट्रांमध्ये आफ्रिका खंडातील अशा अनेक देशांचा समावेश आहे जेथील बहुसंख्य जनता मुस्लिमेतर आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनता असलेले रशिया व थायलंड हे देश ओआयसीचे पर्यवेक्षक (ऑब्झर्व्हर) आहेत. परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत देश मात्र ह्या संघटनेचा सदस्य नाही. काश्मीरवरून भारत व ओआयसीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. पाकिस्तानने भारताचा ओआयसीमधील प्रवेश निषिद्ध केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →