मिलान लिनाते विमानतळ (आहसंवि: LIN, आप्रविको: LIML) हे इटलीतील दुसरे सर्वात मोठे शहर मिलानमधील तीन पैकी एक विमानतळ आहे. २०२४ मध्ये या विमानतळावरून १.०६ कोटी प्रवाशांनी तसेच १,१८,०६० विमानांनी ये-जा केली. हा विमानतळ इटलीतील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. प्रवासी संख्येच्या बाबतीत, माल्पेन्सा आणि बर्गामो नंतर मिलान महानगर क्षेत्रातील हे तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे, तर विमानांच्या हालचालींच्या बाबतीत हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिलान माल्पेन्सा आणि मिलान बेर्गामो या विमानतळांसह लिनाते विमानतळ मिलान विमानतळ प्रणालीचा भाग आहे. २०२४ मध्ये या तीन विमानतळांवरून ५.६९ कोटी प्रवाशांनी ये-जा केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिलान-लिनाते विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.