मिलान बेर्गामो विमानतळ ((आहसंवि: BGY, आप्रविको: LIME)) तथा ओरियो अल सेरियो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा इटलीमधील तिसरा सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ ओरियो अल सेरियो येथे बेर्गामोपासून ३.७ किमी आग्नेयेला आणि मिलानपासून ४५ किमी ईशान्येला स्थित आहे. मिलान मालपेन्सा विमानतळ आणि मिलान लिनेट विमानतळ यांच्यासह हा मिलान विमानतळ प्रणालीचा भाग आहे. २०२४ मध्ये या विमानतळांवरून ५ कोटी ६९ लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.
या विमानतळाला बारोक चित्रकार मिकेलँजेलो मेरिची दा कारॅव्हॅजियो यांच्या नावावरून इल कारॅव्हॅजियो आंतरराष्ट्रीय विमानतळ असेही नाव आहे.
या विमानतळाने २०२४ मध्ये सुमारे १ कोटी ७४ लाख प्रवाशांना सेवा दिली. डब्लिन विमानतळ, लंडन स्टॅनस्टेड विमानतळ आणि ब्रुसेल्स दक्षिण शार्लेरोई विमानतळ यांच्यासोबतच हे रायनएरच्या चार सर्वात मोठ्या तळांपैकी एक आहे.
ओरियो अल सेरियो आंतरराष्ट्रीय विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.