व्हेरोना व्हिल्लाफ्रांका विमानतळ (आहसंवि: VRN, आप्रविको: LIPX), व्हालेरियो कातुलो विमानतळ तथा व्हिल्लाफ्रांका विमानतळ हा इटलीतील व्हेरोना शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या नैऋत्येस १० किमी अंतरावर असलेला हा विमानतळ ए४ मिलान-व्हेनिस आणि ए२२ मोडेना-ब्रेनर या महामार्गांच्या तिठ्याजवळ आहे. हा विमानतळ व्हेरोना, ब्रेशिया, मांतुआ, त्रेंतिनो आणि दक्षिण टायरॉल या प्रांतांमधील ४० लाखांहून अधिक लोकसंख्येला सेवा पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हेरोना व्हिल्लाफ्रांका विमानतळ
या विषयावर तज्ञ बना.