तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TRV, आप्रविको: VOTV) हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे असलेला विमानतळ आहे. येथून भारतातील सगळी प्रमुख शहरे आणि कुवैत, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर, रियाध, दम्मम, शारजाह आणि मध्यपूर्वेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
शहराच्या पश्चिमेस साधारण ४ किमी आणि कोवालम पुळणीपासून १६ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ केरळमधील सगळ्यात पहिला विमानतळ आहे. दक्षिण आशियातील अनेक देशांतील प्रवासी मध्यपूर्वेत जाण्यासाठी या विमानतळाचा उपयोग करतात.
तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.