नवी मुंबई मेट्रोची मार्गिका १ ही भारतातील नवी मुंबई शहरातील जलद परिवहन मेट्रो मार्गिका आहे. काम पूर्णत्वास आल्यावर, २३.४० किमी लांबीची आणि २० स्थानके असलेली ही मार्गिका बेलापूर ते खांदेश्वर पर्यंत उन्नत मार्गावर असेल.
या मार्गिकेचे बांधकाम २०११ मध्ये सुरू झाले आणि मूळतः २०१६ मध्ये उघडण्याचे नियोजन होते, परंतु उदघाटनाला अनेक वेळा विलंब झाला. ११.१ किमी लांबीच्या बेलापूर ते पेंढार ११ स्थानकांसह, या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले.
मार्गिका १ (नवी मुंबई मेट्रो)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.