नाशिक मेट्रो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नाशिक मेट्रो किंवा नाशिक मेट्रोनिओ ही नाशिक महानगर क्षेत्रात प्रस्तावित जलद संक्रमण प्रणाली आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्याबरोबरच नाशिक शहराला त्याच्या उपनगरापासून थेट जोडण्यासाठी ही यंत्रणा प्रस्तावित आहे. बृहत्तर नाशिक मेट्रो देवळाली, नाशिक रोड, उपनगर, नाशिक विमानतळ, सिन्नर, इगतपुरी, गंगापूर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, भगूर, निफाड, आडागाव, घोटी आणि गिरनारे या नाशिक शहर उपनगरे जोडेल.

हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्र व राज्य सरकार, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (ना.म.प्रा.वि.प्रा.) आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यानेराबविणार आहे. ही भारताची पहिली रबर-टायर्ड मेट्रो असेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हणले आहे की लवकरच व्यवहार्यता अहवाल तयार केला जाईल. बृहत्तर नाशिक मेट्रो महामेट्रोमार्फत राबविण्यात येणार असून सिडकोकडून वित्तपुरवठा केला जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →