ठाणे मेट्रो ही ठाणे, महाराष्ट्र येथे सेवा देणारी एक निर्माणाधीन मेट्रो सेवा आहे. मुंबई मेट्रोच्या बांधकामाधीन हिरवी मार्गिका ४ आणि केशरी मार्गिका ५ नंतर ठाण्यातून धावणारी ही तिसरी मेट्रो मार्गिका असेल. या मार्गिकेची लांबी २९ किमी इतकी प्रस्तावित आहे आणि या मार्गिकेवर २२ स्थानके असल्याचे सांगितले आहे. प्रस्तावित २९ पैकी, ३ किमी (१.९ mi) आणि २ स्थानके भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे तर उर्वरित स्थानके उन्नत करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेशातील इतर मेट्रो मार्गांपेक्षा वेगळे, ही मार्गिका ठाणे जंक्शनपासून वागळे इस्टेट, मानपाडा, वाघबीळ, बाळकुम, राबोडी आणि ठाणे रेल्वे स्थानक मार्गे ठाणे जंक्शनपर्यंत जाणारा एक वर्तुळ तयार करते. या मार्गाला केंद्र सरकारने १४ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली होती आणि ही मार्गिका २०२९ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ठाणे मेट्रो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.