मक्का मेट्रो

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मक्का मेट्रो

मक्का मेट्रो ही सौदी अरेबियातील मक्का शहरात चार नियोजित मार्गांची एक मेट्रो प्रणाली आहे. मेट्रोचे बांधकाम चायना रेल्वे कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन ने केले आहे आणि ही प्रणाली मक्का मास रेल ट्रान्झिट कंपनी द्वारे चालवली जाते. मेट्रो ही ६२ अब्ज रियालच्या मक्का सार्वजनिक वाहतूक कार्यक्रमाचा भाग आहे, ज्यामध्ये एकात्मिक बस सेवांचा देखील समावेश असेल.

प्रस्तावित चार मेट्रो मार्गिका मक्का, अराफत, मुजदलिफा आणि मीना यांना जोडणाऱ्या १८.१ किमी लांबीच्या सध्याच्या अल मशाएर–अल मुगद्दस्साह मेट्रो मार्गिकेला वाढावा म्हणून असेल. ही मार्गिका नोव्हेंबर २०१० मध्ये उघडल्या गेली होती.

हज दरम्यान बरेच लोक मक्का मेट्रोचा वापर करतात. मेट्रोची किंमत २५० रियाल आहे, आणि हजच्या शेवटच्या दिवशी प्रवास केल्यास किंमत १०० रियालपर्यंत कमी होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →