महिदपूरची लढाई

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महिदपूरची लढाई २१ डिसेंबर १८१७ रोजी माळवा प्रदेशातील महिदपूर येथे मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या इंदूर संस्थान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली लढाई होती. तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धादरम्यान झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला व त्यांनी होळकरांना पेशव्यापासून विभक्त केले. याचे पर्यवसान ब्रिटिशांचा पूर्ण विजय होउन भारतात ब्रिटिश सत्ता बळकट होण्यात झाले.

२१ डिसेंबर १८१७ रोजी सर थॉमस हिस्लॉपच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी होळकरांवर हल्ला केला. होळकरांच्या सैन्याचे नेतृत्त्व ११ वर्षीय मल्हारराव होळकर तिसरे, २२ वर्षीय हरिराव होळकर आणि २० वर्षीय भीमाबाई होळकर यांच्या नेतृत्वाखालील होळकर होते. रोशन बेगच्या नेतृत्वाखालील होळकर तोफखान्याने ब्रिटिशांवर ६३ तोफांची रांग लावून हल्ला केला. लढाईत ब्रिटिशांचा पराभव निश्चित होता पण नेमक्या त्यावेळी होळकर छावणीतील गफूर खान नावाचा सरदार त्यांना फितूर झाला व आपल्या तुकड्या घेउन त्याने रणांगणातून पलायन केले. यानंतर होळकरांचा निर्णायक पराभव झाला.

लढाई संपल्यावर मल्हारराव, तात्या जोग आणि इतरांनी पळ काढला. ६ जानेवारी १८१८ रोजी मंदसौर येथे त्यांनी ब्रिटिशांशी तह केला. या तहात इंग्रजांनी घालून दिलेल्या सर्व अटी होळकरांनी मान्य केल्या. तिसरे आंग्ल-मराठा युद्ध संपल्यावर ब्रिटिशांनी होळकरांचा बराचसा प्रदेश हिसकावून घेतला आणि इंदूर संस्थानाला सेंट्रल इंडिया एजन्सीची एक रियासत केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →