राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निजामअली यांच्यात झाली. यात हैद्राबादच्या मुस्लिम निझामाचा दारुण पराभव झाला. राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामअलीचा दारुण पराभव केला. हिंदू राजांचा राक्षसी इस्लामी शासकांवर विजय म्हणून ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. या लढाइमधे निजामाचे २२ सरदार कैद करण्यात आले होते.
साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणा विठ्ठल सुंदर यांचा मृत्यु याच लढाईमध्ये झाला. याचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधी राक्षसभुवनमध्ये पुरातन महादेवमंदिर दादेश्वर समोर आजही पाहण्यास मिळते.
राक्षसभुवनची लढाई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!