मराठा साम्राज्य

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १९४७ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तसेच याला हिंदवी स्वराज्य असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी त्याआधी तंजावुर जिंकले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ, व्यंकोजी राव उर्फ ​​एकोजी 1 यांना मिळाले होते आणि ते राज्य, तंजावुरचे मराठा राज्य म्हणून ओळखले जात होते. बंगलोर (बॅंगलोर) विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केम्पे गौड़ा 1 यांचेद्वारे 1537 मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला 1638 मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रानादुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली एक बड़ी आदिलशाही बीजापुर सेना द्वारे बेंगलोरवर कब्जा केला गेला होता, ज्यांनी केंम्पे गौड़ा 3 यांना पराजित केले होते आणि बेंगलोरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे साम्राज्याचा विस्तार वाढला. इ.स. १६८०मधील महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या, मात्र १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्त्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सिमा वाढविल्या. पेशवे हे एक उत्कृष्ट सेनानी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय उपखंडावर ताबा मिळवण्यापूर्वी बहुतेक भारतीय उपखंडातील मुघल राजवटीचा अंत करण्याचे श्रेय मराठ्यांना दिले जाते. शेवटी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर, तिसऱ्या इंग्रज-मराठा लढाईत पराभूत झाला व इंग्रज त्यांना बिठूर येथे पेन्शन देऊन पाठवले (झाशीच्या राणीच्या काळात).

गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या क्षेत्रावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व सेनासरखेल कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारताच्या इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठा आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांनी भारताच्या पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →