पालखेडची लढाई फेब्रुवारी २८, १७२८ रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहराजवळ असलेल्या पालखेड येथील लढाई होती.
पहिल्या बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य व हैदराबादचा निझाम यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावांनी निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून निझामाला हरवले. हे बाजीरावांच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे.
पालखेडची लढाई
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.