तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.
या आधी झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले. या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) यांनी साथ दिली, पण युद्धात पेशवा, भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महिदपुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी, कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, पेशवा बाजीराव दुसरा आणि शिंदे यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली.
नागपूरच्या मुधोजी भोसले दुसरे आणि इंदूरचे मल्हारराव होळकर तिसरे यांच्या पाठिंब्याने पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सैन्याने ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध जोरदार हल्ला केला. ग्वाल्हेरचे चौथे मोठे मराठा नेते दौलतराव शिंदे यांनी राजस्थानवरील नियंत्रण गमावले, असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने मराठा साम्राज्य फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला कानपूरजवळील बिठूर येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश मुंबई प्रेसिडेंसीमध्ये विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीच्या डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. नागपूर व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच बुंदेलखंडमधील पेशव्याचे प्रदेश ब्रिटिश भारताचे सौगोर आणि नेरबुद्दा प्रांत म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे इंदूर शिंद्यांचे ग्वाल्हेर व पेशव्यांच्या हुकुमतीतील झांसी ही संस्थाने आपल्या अंमलात आणली.
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!