महादजी शिंदे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

महादजी शिंदे

महादजी शिंदे (जन्म : इ.स.३ डिसेंबर १७३०; - १२ फेब्रुवारी १७९४ हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.

महादजी शिंदे महादजी शिंदे (१७३० - १२ फेब्रुवारी १७९४) हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी, मुत्सद्दी आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना, महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली.

त्यांचा जन्म १७३० मध्ये साताऱ्याजवळील कन्हेरखेड या गावात झाला. ते शिंदे यांच्या घराण्यातील असून, त्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे होते. महादजी शिंदे यांचे बालपण आणि तारुण्य सैनिकी आणि राजकीय शिक्षणात गेले. १७६१ च्या पानिपत युद्धात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूला हरवून ते पुन्हा उभे राहिले. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला आपले मुख्य ठिकाण बनवले आणि उत्तरेतल्या राजकारणात मराठ्यांना पुन्हा महत्व प्राप्त करून दिले.

महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. त्यांचा मुघल बादशाहावर इतका प्रभाव होता की इतिहासकार आर एस चौरसिया म्हणतात की जरी मुघल नावाने भारताचा बादशाह होता तरी तो केवळ बाहुली होता महादजी शिंदेंचा . त्यांनी निजाम, हैदराबाद आणि बंगाल प्रांतातीलही अनेक प्रांतांवर प्रभाव टाकला. इंग्रजांशी त्यांनी काटेकोर सामरिक आणि मुत्सद्देगिरीने व्यवहार केला, त्यांच्याशी करार करताना मराठा हिताची तडजोड केली नाही. त्यांनी मराठा दरबारात एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी यंत्रणा निर्माण केली.

महादजी शिंदे यांनी स्वतःस “वाक्यसामर्थ्यसंपन्न” बनवले होते. दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे जे कार्य त्यांनी केले, ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नाही. त्यांची मुत्सद्देगिरी केवळ लष्करी विजयापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी राजकारण, अर्थकारण आणि परराष्ट्र संबंधातही अमूल्य योगदान दिले. त्यांनी अनेक वेळा इंग्रज आणि मुघलांना आपले म्हणणे मान्य करायला भाग पाडले. त्यांच्यामुळेच दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे अधिपत्य पुन्हा बसले.

१२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळ वनेवाडी येथे झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्थापन केलेल्या सामर्थ्य ग्वाल्हेर संस्थानाने पुढे दीर्घकाळ प्रभाव टिकवून ठेवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →