महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

महाराष्ट्राच्या आठव्या विधानसभेसाठी व २८८ जागांसाठी २७ फेब्रुवारी १९९० रोजी मतदान झाले. या निवडणुकीत शरद पवाराच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १४१ तर शिवसेनेने ५१ आणि भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. १९९० नंतर शिवसेना व भाजप या पक्षांचा राज्यात प्रभाव वाढू लागला होता. १३ अपक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ४ मार्च १९९० ते २४ जून १९९१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर होते.

१९९१ मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पेरांबूर येथे एका मानवी बॉम्बच्या माध्यमातून पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधींच्यानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी पी.व्ही. नरसिंहराव यांच निवड झाली व काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी पवारांना दिल्लीला बोलावून घेतले व त्यांच्याकडे संरक्षण खाते सोपवले. शरद पवार जवळपास २० महिने संरक्षणमंत्रीपदावर होते. राज्यात पवारांनी राजीनामा दिल्यानंतर सुधाकर नाईक यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. २५ जून १९९१ ते ४ मार्च १९९३ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर ३० वर्षानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले.

याच काळात लालकृष्ण अडवाणींनी देशभरात रथयात्रा काढून राम मंदिराचा व प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी सुमारे दीड लाख लोकांच्या जमावाने अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. बाबरीचे पडसाद महाराष्ट्रात व मुंबईतही उमटले. मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पंतप्रधानांनी शरद पवार यांना तत्काळ मुंबईत जाऊन राज्याची सूत्रे हाती घेण्यास सांगितले. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवार राज्यात परतताच केवळ ८ दिवासात मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. हिंदू-मुस्लिम दंगलीनंतर शुक्रवार, १२ मार्च १९९३ रोजी दुपारी दीड ते साडे तीनच्या दरम्यान १३ साखळी बॉम्बस्फोटाने शहर उद्धवस्त झाले.

३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांना भूकंपाचा जोरदार तडाका बसला. यावेळी मुख्यमंत्रीपदी शरद पवार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →