शरद पवार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शरद पवार

शरद गोविंदराव पवार (१२ डिसेंबर १९४०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते माजी अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गट पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत.

शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, अजित पवार हे त्यांचे पुतणे, रोहित राजेंद्र पवार आणि चि.युगेंद्र श्रीनिवास पवार हे पुतण्याचे पुत्र आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे.

राजकारणाच्या बाहेर, शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. २०१७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →