महाविकास आघाडी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महाविकास आघाडी ही २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली राज्यस्तरीय राजकीय आघाडी आहे. महाविकास आघाडी मध्ये काॅंग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व काही अपक्ष आमदार सुद्धा आहेत. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाविकास आघाडी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →