महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते.
विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार अस्तित्वात आहे.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व तद्नंतर आश्चर्यकारकरित्या थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली.
पुढे अडीच वर्षांनंतर जुन २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. त्या दोघांचे सरकार २ महिने चालले मग मंत्रीमंडळाच्या विस्तारात शिवसेना-भाजपच्या १०-१० कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली.
०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्य प्रतोदासह गटनेत्याविरुद्ध बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांचा एक गट विद्यमान सरकारमध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील २रे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली व इतर ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.