२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपुर्ण महाराष्ट्रात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ६१.४% मतदान झाले होते. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु सरकार स्थापनेवरील विशेषतः मुख्यमंत्रीपदासंदर्भातील मतभेदांनंतर, युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झाले.
कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने राज्यात ३ऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
परंतु, वेगवान राजकीय घटनांनी २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे राष्ट्रपती कार्यालयाने राष्ट्रपती राजवट उठवल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून घेतली.
तथापि, या दोघांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तात्काळ बहुमत सिद्ध करण्याच्या निर्णयामुळे बहुमतचाचणी होण्याच्या आधीच राजीनामा द्यावा लागला अन् २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन समुहांतर्गत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले.
अडीच वर्षाच्या (जुन-२०२२) कालावधीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड घडवल्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या समर्थनाने मुख्यमंत्री झाले, तद्नंतर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युती झाली. त्यामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अजित पवार हे देखील २रे उपमुख्यमंत्री म्हणून (जुलै-२०२३पासुन) आपला कार्यकाळ पूर्ण केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?