उद्धव ठाकरे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (२७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्ष (कार्यकारी प्रमुख) पदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. २९ जून २०२२ रोजी आघाडी सरकार अल्पमतात गेल्याचा दावा करीत राज्यपालांनी बहुमत परीक्षणाचे आदेश देऊन, एकतर्फी विधिमंडळाचे अधिवेशन बोलावल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

शिवसेनेची हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून लोकशाहीवादी व सुसंस्कृत पक्ष अशी नवीन ओळख देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. एक उत्तम संघटक बनून सुसज्ज (शिवसैनिक-आधारीत) राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (२०१०) आणि "पहावा विठ्ठल" (२०११) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →