भूत जोलोकिया

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

भूत जोलोकिया

भूत जोलोकिया किंवा भूत मिरची (आसामीमध्ये:भूतान मिरची), ही ईशान्य भारतात लागवड केली जाणारी एक विशिष्ट संकरित मिरचीची जात आहे. ही मिरची कॅप्सिकम चिनेन्स आणि कॅप्सिकम फ्रूटेसेन्सचे या दोन जातीचा संकर करून निर्माण केलेली आहे.

२००७ मध्ये, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स ने भूत जोलोकिया ला जगातील सर्वात तिखट मिरची असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ही मिरची तत्कालीन टॅबॅस्को सॉसपेक्षा १७० पट जास्त तिखट ठरली होती. या मिरचीला दहा लाख स्कोव्हिल हीट युनिट्स (SHUs) (१०,०१,३०४ SHU) पेक्षा जास्त रेट दिले जाते. तथापि कालांतराने, सर्वात तिखट मिरची वाढवण्याच्या शर्यतीत, २०११ मध्ये 'त्रिनिदाद स्कॉर्पियन बुच टी मिरची' आणि २०१३ मध्ये 'कॅरोलिना रीपर'ने भूत जोलोकिया मिरचीला मागे टाकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →