डल्ले खुर्सानी किंवा अकबरे खुर्सानी, लाल चेरी मिरची किंवा फक्त डल्ले ही मिरचीची एक विशेष जात असून हीची प्रामुख्याने नेपाळ, भारतात सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यात लागवड केली जाते. या मिरचीचा तिखटपणा १,००,००० आणि ३,५०,००० SHU ( स्कोव्हिल हीट युनिट्स) च्या दरम्यान आहे. ही हबनेरो मिरची सारखीच तिखट मानली जाते. २०२० मध्ये, सिक्कीम राज्याला या मिरचीसाठी भौगोलिक मानांकन (GI) टॅग प्राप्त झाला. १४ सप्टेंबर २०२१ रोजी या मिरचीचा भौगोलिक मानांकन दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आला.
ही मिरची आकाराने गोल असून, नेपाळी भाषेत डल्ले खुर्सानी या नावाचा शब्दशः अर्थ 'गोल मिरची' असा होतो. नेपाळमध्ये, या मिरचीला अकबरे खुर्सानी (मिरचीचा राजा) किंवा जानमारा खुर्सानी (खुनी मिरची) असेही म्हणतात.
डल्ले खुर्सानी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.