कोल्हापूर

या विषयावर तज्ञ बना.

कोल्हापूर

कोल्हापूर हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी तसेच धार्मिक क्षेत्र वाडी रत्‍नागिरी येथील जोतिबा खोची येथील भैरवनाथ मंदिर इत्यादी प्रमुख ठिकाणे आहेत. कोल्हापूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणूनही ओळखले जाते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →