धारवाडी म्हैस

या विषयातील रहस्ये उलगडा.

धारवाडी म्हैस

धारवाडी म्हैस ही मुख्यतः दूध उत्पादनासाठी पाळल्या जाणाऱ्या भारतीय म्हशीची एक जात आहे. ही प्रामुख्याने दुधाच्या उद्देशाने पाळली जाते. या म्हशीचे दूध सुप्रसिद्ध धारवाडी पेढे तयार करण्यासाठी वापरले जाते. या पेढ्याला भौगोलिक मानांकन म्हणजे G.I. टॅग देखील प्राप्त आहे.

या जातीचे सरासरी दुग्धोत्पादन ९७२ लिटर आहे. दैनंदिन दुधाचे उत्पादन १.५ ते ८.७ लीटरपर्यंत असते. दुधाच्या फॅटची सरासरी टक्केवारी ६.९ आहे. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये धारवाडी म्हशींचे संगोपन करणे योग्य आहे.



२०२१ साली धारवाडी म्हैस ही देशातील १७वी मान्यताप्राप्त देशी म्हशीची जात ठरली. कर्नाटकातील म्हशीची ही पहिली जात आहे ज्याला हे महत्त्व प्राप्त झाले. अभ्यास, संशोधन किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी जगभरात जातीची ओळख पटवण्यासाठी ही मान्यता महत्त्वाची आहे.

परंपरेने या म्हशींना मोकळेपणाने फिरू दिले जाते आणि त्यांना क्वचितच बांधले जाते. कर्नाटकातील लोक त्यांच्या दिवसभराच्या जेवणातून उरलेले अन्न भांड्यात ठेवायचे आणि ते म्हशींना खायला घालायचे. कर्नाटकात आजही ही प्रथा पाळली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →