मराठवाडी म्हैस (इंग्रजी:Marathvadi Buffalo) हा एक पाण म्हशीचा प्रकार असून ही म्हैस मुख्यतः नांदेड, परभणी, लातूर, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात आढळून येते. मराठवाडी म्हैस ही प्रकृतीने अतिशय काटक आणि मध्यम बांध्याची असते. तसेच ही सामान्य चाऱ्यावर दिवसाकाठी ३ ते ५ लिटर दुधाचे उत्पादन देते. म्हशीची ही जात सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. म्हशीच्या या प्रकाराला 'एलिचपुरी' आणि 'दुधणाथडी' या नावाने देखील ओळखले जाते. मराठवाड्यातील उष्ण आणि कोरड्या वातावरणास म्हशीचा हा प्रकार जुळवून घेऊन दुधाचे चांगले उत्पादन देते. यामुळे या म्हशीला मराठवाड्याचे काळे सोने असे म्हणतात. दुग्धोत्पादनातील स्पर्धेत मराठवाडी म्हैस दुर्लक्षित झाली आहे असे मानले जाते.
मराठवाडी म्हशींना सहसा ज्वारीचा कडबा, भाताचा पेंढा, उसाची पाने आणि शेतातील गवत दिले जाते. दुग्धोत्पादनाचे सरासरी दूध उत्पादन १११८ किलो आणि दुधाचे फॅट सरासरी ८.८% पर्यंत असून साधारणतः ६.२५ ते १०.५ % पर्यंत कमीजास्त असते
मराठवाडी म्हैस
या विषयावर तज्ञ बना.