पाण म्हैस

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाण म्हैस

पाण म्हैस किंवा भारतीय म्हैस हा एक भारतीय म्हशीचा प्रकार आहे. हे दुधाळू जनावर आहे. नर म्हशीला रेडा म्हणतात. म्हैस हा प्राणी सर्वसाधारण काळ्या रंगाचा असतो. क्वचित, एखाद्या म्हशीच्या डोक्याचा थोडा भाग पांढरा असतो.

भारतीय म्हैस किंवा पाण म्हैस आणि जंगली म्हैस हे भारतात आढळणारे दोन वेगवेगळे उपप्रकार आहेत. भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला. आफ्रिकन जंगली म्हैस भारतीय म्हशीसारखीच दिसते पण प्रत्यक्षात ती एका वेगळ्या जातीची (genus) आहे.

लहानग्या रेड्याला टोणगा म्हणतात. म्हशीच्या नर पिल्लाला पारडू आणि मादी पिल्लाला पारडी असे म्हणतात. मराठवाड्यात ग्रामीण भाषेत नर म्हशीला 'हल्ल्या' असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →