भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम (जन्म:१२ जून, १९७२) हे मराठी चित्रपट अभिनेते, नाट्य अभिनेते आणि दूरचित्रवाहिनी अभिनेते आहेत. कदम हे विशेष करून आपल्या विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी एका मराठी नाटकात प्रथम काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. फू बाई फूच्या भूमिकांबद्दल ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० हून अधिक नाटकांच्या प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे. झी मराठी या वाहिनी वरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमात देखील त्यांनी आपल्या अभिनयाची चांगली छाप पाडली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भालचंद्र कदम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.