सतीश तारे आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकजनांचे दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते व रंगकर्मी होते.
सतीश यांचे वडील जयंत तारे नाटय़कर्मी असल्यामुळे बालनाटय़ांपासूनच सतीश यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. अलीकडे ‘फू बाई फू’ या गाजत असलेल्या रिअॅलिटी शोच्या चौथ्या पर्वाचे ते विजेते ठरले होते.‘विच्छा माझी पुरी करा’मधील त्यांच्या अभिनयानेही रसिकांची मने जिंकली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या नाटकाद्वारे सतीश तारे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘श्यामची मम्मी’, ‘जादू तेरी नजर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी रसिकप्रेक्षकांना आपल्या उत्स्फूर्त अभिनयाची मोहिनी घातली. झी मराठी वाहिनीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत त्यांनी रंगविलेली ‘माऊली’ ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली.
सतीश तारे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.