सागर कारंडे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि लेखक आहे. फू बाई फू या कार्यक्रमात त्याने भारत गणेशपुरे बरोबर केलेले विविध विनोदी सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या कार्यक्रमातील आठव्या पर्वात ही जोडी विजेती ठरलेली आहे. यानंतर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका सादर केल्या आहेत. विशेषतः पोस्टमन म्हणून त्याने केलेले विविध भागातील पत्र वाचन हृदयस्पर्शी ठरलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सागर कारंडे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.