भारतीय वायुसेनेत सेवारत विमाने

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भारतीय सशस्त्र दलांमध्ये भारतीय सेना, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांचा समावेश होतो. हे तिन्ही दले आणि भारतीय तटरक्षक दल लढाऊ, टेहळणी, टँकर आणि वाहतूक विमाने, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहने वापरतात.

भारतात बांधणी केलेले सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख लढाऊ विमान आहे. तेजस हे भारतीय वायुसेनेचे पहिले स्वदेशी लढाऊ विमान आहे. हे २०१५ मध्ये सेवारत झाले. राफेल हे भारतीय वायुसेनेतील नवीनतम विमान आहे. हे जुलै २०२० मध्ये सेवारत झाले. यांशिवाय रशियन आणि भारतीय बनावटीची मिग २१ आणि मिग २९, फ्रेंच मिराज आणि ब्रिटिश जग्वार विमानेही भारतीय वायुसेनेमध्ये आहेत. वायुसेना अनेक प्रकारची वाहतूक विमानेही वापरते. या ताफ्यात बहुतेक विमाने जुनी अँटोनोव्ह एएन-३२, डोर्नियर २२८ आणि हॉकर सिडले एचएस ७४८ प्रकारची आहेत. २०१० च्या दशकात, भारतीय वायुसेनेने मोठ्या अमेरिकन एर-लिफ्टर्स C-17 आणि सी-१३०जे विमानांना ताफ्यात घेतले. २०२३ मध्ये ताफ्यातील जुन्या विमानांच्या बदली सी-२९५ वाहतूक विमाने समाविष्ट करण्यास सुरुवात केली.

भारतीय हेलिकॉप्टर ताफ्यात फ्रेंच अलूएत आणि एसए ३१५ यांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर परवान्यातहत भारतात परवानाकृत बांधली जातात. रशियन बनावटीचे मिल एमआय-१७ आणि मिल एमआय-२४ हे हेलिकॉप्टर ताफ्यातील प्रमुख हेलिकॉप्टरे आहेत. एचएएलने सशस्त्र दलांच्या वापरासाठी ध्रुव, प्रचंड आणि रुद्र या प्रकारच्या हेलिकॉप्टरांची रचना आणि बांधणी केलेली आहे. २०२० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून, भारताने अमेरिकन बनावटीचे एएच-६४ आणि सीएच-४७ प्रकारचे हेलिकॉप्टर आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहेत. याशिवा भारतीय वायुसेना अनेक प्रकारचे स्थानिक आणि आयात केलेली टेहळणी आणि मानवरहित विमाने वापरते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →