भारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पूर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला.
दौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकूण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकूण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णित राहिले व संघ ८ सामन्यात पराभूत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकूण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.