भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद अजित वाडेकर यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात मागील दौऱ्यात भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर अजित वाडेकर क्रिकेटमधून निवृत्त झाले.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.