बिराज बहू हा १९५४ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे जो हितेन चौधरी निर्मित आणि बिमल रॉय दिग्दर्शित आहे. हा शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात कामिनी कौशल, अभि भट्टाचार्य आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका असून सलील चौधरी यांचे संगीत आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी ऑल इंडिया सर्टिफिकेट ऑफ मेरिट मिळाले होते.
त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मधुबाला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास उत्सुक होती. यासाठी तिने बिमल रॉय यांच्या कार्यालयात अनेक वेळा भेट दिली. तथापि, ती जास्त मानधन मागेल असे वाटून रॉयने कामिनी कौशलला निवडले. तिच्या फीमुळे तिची भूमिका गेली हे कळताच, मधुबालाने सांगितले की तिने बिराज बहू मध्ये एका रुपयातही काम केले असते.
बिराज बहू
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.