सुजाता (१९५९ चित्रपट)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सुजाता हा १९५९ चा बिमल रॉय यांचा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यात नूतन आणि सुनील दत्त मुख्य भूमिकेत आहेत तर शशिकला, ललिता पवार, सुलोचना लाटकर आणि तरुण बोस यांच्या सहाय्यक भूमिका आहे. लेखक सुबोध घोष यांच्या सुजाता नावाच्या बंगाली लघुकथेवर हा आधारित आहे. या चित्रपटात भारतातील जातीवादाच्या परिस्थितीचा शोध घेण्यात आला आहे ज्यात एक ब्राह्मण समाजातील युवक (दत्त) एका अस्पृश्य जातीतील मुलीच्या (नूतन) प्रेमात पडतो. चित्रपटाचे गीत एस.डी. बर्मन यांचे आहे आणि गीते मजरूह सुलतानपुरी यांनी लिहीली आहेत. १९६० च्या कान्स चित्रपट महोत्सवात त्याचा समावेश करण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →