देवदास (१९५५ चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

देवदास हा १९५५ सालचा बिमल रॉय दिग्दर्शित भारतीय चित्रपट असून शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी देवदासवर आधारित आहे. या चित्रपटात दिलीप कुमार या मुख्य भूमिकेत आहे. वैजयंतीमाला ने चंद्रपुखी नावाची भूमिका केली होती, तर सुचित्रा सेनने तिच्या बॉलिवूड मधील या प्रथम चित्रपटात पार्वती म्हणून भूमिका केली होती. मोतीलाल, नाझीर हुसेन, मुराद, प्रतिमा देवी, इफ्तेखार आणि शिवराज इतर मुख्य भूमिकेत होते आणि जॉनी वॉकर आणि प्राण यांच्या लहान भूमिका होत्या.

२००५ मध्ये, इंडियाटाइम्स मूव्हीजने बॉलिवूड चित्रपटातील अव्वल २५ चित्रपटात याचे नाव नोंदवले. कमल बोस यांच्या नेतृत्वात सिनेमॅटोग्राफी आणि प्रकाशयोजनेसाठीही या चित्रपटाची नोंद झाली आहे ज्याने दिलीप कुमारने साकारलेल्या भावनांच्या छटा वाढविल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →