साहिब बीबी और गुलाम हा १९६२ सालचा भारतीय हिंदी चित्रपट आहे जो गुरू दत्त निर्मित आणि अबरार अल्वी दिग्दर्शित आहे. बिमल मित्राच्या साहेब बीबी गोलम या बंगाली कादंबरीवर आधारित असून ब्रिटिश राजवटीत बंगालमधील सरंजामशाहीच्या शोकांतिकेच्या घटनेचा हा एक देखावा आहे. चित्रपटाची कथा ही एका खानदानी (साहिब)ची सुंदर एकटी पत्नी (बीबी) आणि अल्प-उत्पन्न मिळवीणाऱ्या नोकर (गुलाम) यांच्यातील अलैंगिक मैत्रीचा शोध घेते. चित्रपटाचे संगीत हेमंत कुमार यांचे आहे आणि गीत शकील बदायुनी यांचे होते. व्ही. के. मूर्ती यांच्या उत्तम छायांकनासाठी देखील या चित्रपटाची नोंद केली आहे. या चित्रपटात गुरू दत्त, मीना कुमारी, रेहमान, वहीदा रहमान आणि नजीर हुसेन असे कलावंत आहेत.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण टीकाकारांनी मीना कुमारीच्या अभिनयाने साकारलेल्या छोटी बहूच्या पात्राला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून श्रेय दिले. १३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व ऑस्कर पुरस्कारामध्ये भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून हा निवडला गेला. चित्रपटाने चार फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट) जिंकला. इंडियाटाइम्स मुव्हीज अनुसार बॉलिवूड चित्रपटातील अव्वल २५ चित्रपटांपैकी हा एक आहे.
साहिब बीबी और गुलाम
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.