पूरब और पश्चिम हा १९७० चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केले आहे आणि यात मनोज कुमार, सायरा बानो, अशोक कुमार, प्राण आणि प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत कल्याणजी आनंदजी यांचे आहे. २००७ मध्ये आलेला नमस्ते लंडन हा चित्रपट याच चित्रपटापासून प्रेरित आहे.
मनोज कुमार यांचा हा दुसरा चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी भरतची भूमिका केली होती (पहिला चित्रपट उपकार ) आणि देशभक्तीवरील त्यांच्या चार चित्रपटांपैकी हा एक आहे (शहीद (१९६५), रोटी कपडा और मकान (१९७४) आणि क्रांती (१९८१)).
भारतात, चित्रपटाने 45 दशलक्ष (US$९,९९,०००) कमाई केली. यामुळे हा १९७० चा भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट बनला.
परदेशात युनायटेड किंग्डममध्ये, हा चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झाला आणि लंडनमध्ये ५० आठवड्यांहून अधिक काळ चालला. या चित्रपटाने यूकेमध्ये £२८५,००० ची कमाई केली, जी 2.5 दशलक्ष (US$५५,५००) इतकी आहे. या चित्रपटाने १९७० मध्ये युकेमध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते चित्रपटाचा युके बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडला. पूरब और पश्चिम ने हा यूके रेकॉर्ड २३ वर्षे ठेवला जो १९९४ मध्ये हम आपके है कौन ने मोडला.
पूरब और पश्चिम
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?