बैराग (चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बैराग हा १९७६ चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. मुशीर-रियाझ या जोडीने निर्मित केलेला हा चित्रपट असित सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दिलीप कुमारांची मुख्य भूमिका आहे, ज्यांना तिहेरी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेर नामांकन मिळाले होते. बैरागमध्ये सायरा बानू, लीना चंदावरकर, रूमा गुहा ठाकुरता, प्रेम चोप्रा, हेलेन, सुजित कुमार, मदन पुरी, पेंटल, कादर खान, असित सेन आणि सचिन पिळगांवकर यांच्या इतर भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत कल्याणजी-आनंदजी या जोडीचे आहे, ज्यांना सर्वोत्कृष्ट संगीतासाठी फिल्मफेर नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला पी. हरिकिशन यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनीसाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. ही दिलीप कुमार यांची बॉक्स ऑफिसवर सलग तिसरा अपयशी चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर, ते काही काळासाठी कामापासून दूर झाले आणि क्रांती (१९८१) मध्ये ४ वर्षांनी परतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →